breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘जलयुक्त’साठी श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासींचा हल्ला

चांदवड – चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेतंर्गत ‘जलयुक्त’चे कामकाज सुरू असताना स्थानिक आदिवासी नागरिकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत श्रमदानासाठी आलेले नागरीक जखमी झाले आहेत.

वन विभागाच्या हद्दीत ही जमीन येते. ही वनजमीन आदिवासी कसत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या जमिनीवर आदिवासींनी अतिक्रमण केले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आज मतेवाडीत वॉटर कप स्पर्धेतंर्गत जलयुक्तसाठी श्रमदान करण्यात येणार होते. श्रमदानासाठी नागरिक साधनसामु्ग्रीसह पोहचले होते. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या नागरिक इतरत्र धावू लागले. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाने सहा मोटरसायकल जाळले असल्याचे वृत्त आहे.

या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी मनमाडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकदेखील दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button