breaking-newsपुणे

जलपर्णी काढण्यासाठी सामाजिक संघटना नदीपात्रात

पिंपरी – संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने खूप मोठ्या प्रमाणात डास वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबतीत काही विशेष उपाय-योजना होत नसल्याने अखेर सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरीकांनी जुनी सांगवी येथील स्मशानभूमी जवळील घाटावर जलपर्णी काढण्याच्या कामास सुरुवात केली.

रोटरी क्‍लब, जलपर्णी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मुसुडगे, मनसे पर्यावरण विभागाचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, रोटरी क्‍लब बाल्हेकरवाडी व इतर सामाजिक संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू केली. साई स्नेहल पार्कचे रहिवासी, निखिल कदम, आनंद भुजंग, परिक्षित कुलकर्णी, तुषार लिंबोरे, प्रथमेश घोलप, प्रवीण कोकाटे, गणेश काची यांनी या कामात सहकार्य केले.

बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी नाष्टा, चहा व थंड पाण्याचे सोय स्थानिक नागरिकांनी केली होती. प्रशासनाला दोष देण्याऐवजी स्वतःच जलपर्णी काढून काही तरी करून दाखवल्याचा आनंद यावेळी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्‍त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button