breaking-newsआंतरराष्टीय
जम्मू-काश्मीर: आरएसएस नेत्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथील जिल्हा रुग्णालयातील मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा (पीएसओ) यामध्ये मृत्यू झाला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
किश्तवाड येथे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत शर्मा यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये शर्मा गंभीर जखमी झाले आहेत. तर जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आलेल्या त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकाचा यात मृत्यू झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षकांनी शोध मोहिम हाती घेतली आहे.