breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

जगातील सर्वात वेगवान धावपटू बोल्ट शेवटची शर्यत हरला!

लंडन : जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टला आपल्या कारकीर्दीतील शेवटची शर्यत जिंकता आली नाही. अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने ही १०० मीटरची शर्यत ९.९२ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरलं, तर अमेरिकेच्याच क्रिश्चन कोलमनने ९.९४ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावलं. खराब सुरुवात झाल्याने युसेन बोल्टला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. त्यानं ९.९५ सेकंदात ‘फिनिशिंग लाइन’ पार केली.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील शर्यतीनंतर आपण कारकीर्दीची सांगता करणार असल्याचं जमैकाच्या युसेन बोल्टनं जाहीर केलेलं असल्यामुळे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा लंडनच्या १०० मीटर ट्रॅकवर खिळल्या होत्या. या मानाच्या स्पर्धेत तो १२व्या सुवर्णपदकावर नाव कोरेल, याची खात्रीच बोल्टच्या चाहत्यांना होती. पण, अनेक शर्यती अगदी आरामात पूर्ण करणारा बोल्ट आज झगडताना दिसला. सुरुवातीलाच काहीतरी बिनसल्यानं त्याला शेवटपर्यंत सूरच गवसला नाही. परिणामी, बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तो शर्यत हरला, पण आपल्या खिलाडू वृत्तीनं त्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली. जस्टीन गॅटलीन जिंकल्याचं स्क्रीनवर झळकताच, बोल्टन त्याच्याजवळ जात त्याला मिठीच मारली. तेव्हा, संपूर्ण स्टेडियममध्ये युसेन बोल्टच्या नावाचा जयजयकार सुरू होता. १०० मीटर ट्रॅकचा निरोप घेताना तो काहीसा भावुकही झाला होता. उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करत, काही जणांसोबत सेल्फी काढत तो मैदानाबाहेर गेला, तेव्हा ट्रॅक अँड फिल्डमधील एक पर्व संपल्याच्या जाणिवेनं सगळेच गहिवरले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button