breaking-newsराष्ट्रिय

जगभ्रमंती करुन सहा महिला नौदल अधिकारी गोव्यात दाखल

पणजी : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिकाऱ्यांसह जगभ्रमंतीला निघालेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ ही शिडाची बोट गोव्यात परतली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा समुद्रकन्यांचे स्वागत केले. महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.

आशियाई महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलीच वेळ होती. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सहा जणींनी तयारी केली होती. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचं बंदर होतं. त्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकाऱ्यांनी 21 हजार 600 सागरी मैल अंतर पार केले.

जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला वाईट हवामानाला तोंड द्यावे लागले. सात मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी 60 किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट 55 फूट लांबीची असून गोव्यातच अॅक्वारिस शिपयार्डमध्ये बांधण्यात आली होती. समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाऱ्यांनी अनुभव घेतला.

Raksha Mantri

@DefenceMinIndia

Smt @nsitharaman welcomes the crew of INSV Tarini along with Chief of the Naval Staff Admiral Sunil Lanba in Goa.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Defence Spokesperson

@SpokespersonMoD

Salute to skipper Lieutenant Commander Vartika Joshi and her crew – Lieutenant Commanders Pratibha Jamwal, Swati P and Lieutenants Aishwarya Boddapati, S Vijaya Devi and Payal Gupta on their return from expedition – Navika Sagar Parikrama on 21 May 2018.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button