breaking-newsपुणे

जगताप डेअरी चाैकात अवजड वाहनांना बंदी

पिंपरी- महापालिका व  न्यू टाऊनशिप डेव्हलपमेंट अॅथॉरिटी यांचे जगताप डेअरी चौकात ग्रेड सेपरेटर, पार्क स्ट्रीट येथे सबवे व जगताप डेअरी चौक येथे दुहेरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री साडेअकरा या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

काळेवाडी फाटा चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यानच्या रस्त्यावर लक्झरी बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रक आणि इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शासकीय वाहने व रुग्णवाहिका वगळता बंदी घालण्यात आली आहे. कस्पटे चौक ते जगताप डेअरी चौक  दरम्यानच्या रस्त्यावर लक्झरी बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रक आणि इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शासकीय वाहने व रुग्णवाहिका वगळता बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button