मुंबई
छायाचित्रकारिता कला नसून ध्यास : प्रदीप बांदेकर

मुंबई: छायाचित्रकारिता ही केवळ कला नसून ध्यास असे मत व्यक्त करत छायाचित्रकारिता छंद म्हणून जोपाल्यास छायाचित्रकाराचे भविष्य उज्ज्वल असल्याचा सल्ला ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार प्रदीप बांदेकर यांनी या क्षेत्रात येणाऱ्यांना दिला. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र संलग्न एनयुजे इंडिया च्या वतीने शनिवारी दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित केलेल्या “क्रिस्टल वर्ल्ड व वाघामारे युवती म्युझिक प्रस्तूत छायाचित्र राष्ट्रीय प्रतियोगिता व प्रदर्शनी, छायाचित्र पत्रकारिता कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती . स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये युनियनचे अध्यक्ष डॉ. उदय जोशी, बाबा लोंढे महासचिव शीतल करदेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छायाचित्र प्रदर्शनातील निवडक छायाचित्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
छायाचित्र ही एक उत्तम कला आहे. छायाचित्रकाराने ती आत्मसात करताना चांगला दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही छायाचित्र बोलके असले की त्यावर लिहण्याची आवश्यकता लागत नाही. छायाचित्र स्वतःच आपली ओळख पटवून देत असते,त्याचबरोबर मान्यवर छायाचित्रकारांच्या शैलीचा अभ्यासही आवश्यक आहे असे मत या वेळी ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी मांडले. सरचिटणीस शीतल करदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . स्पर्धेचे मार्गदर्शक बाबा लोंढे यांनी या पहिल्या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
अप्रतिम छायाचित्र टिपणाऱ्या छायाचित्रकारांचे महत्व जाणून छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या छायाचित्रातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवलेही या वेळी भरवले होते.या पहिल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बाहेरच्या राज्यातील पत्रकारही सहभागी झाले होते. मात्र उशिरा आलेल्या प्रवेशांमुळे स्पर्धेसाठी न घेता प्रदर्शनात ही छायाचित्रे मांडण्यात आली होती . सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर , प्रदूषण महामंडळाचे संजय भुस्कुटे यांनि विशेष सहकार्य केले तसेच महेंद्र साळवे, अभय देठे , विजय माझी शैली , अजय पंणदिरकर प्रभा शंकर सिंह यांचेही सहकार्य लाभले. एयुजे इंडियाचे नेते शिवेंद्रकुमार यांनी प्रदर्शनाला भेट देऊन सांगितले की एनयूजे इंडिया हमेशा पत्रकारोके हक के लिये लढने के साथ पत्रकारोको सम्मान देने का काम कर रहा है. एनयूजे महाराष्ट्र के युनिटने स्पर्धा का आयोजन करके छायाचित्र पत्रकरोंका सम्मान किया है , ये बहुतही अभिनंदनीय है . राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनीही छायाचित्र पत्रकारांना अशा प्रकारच्या कौतुकाची आणि प्रोत्साहनाची गरज असल्याचे प्रदर्शनाच्या भेटीत सांगितले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्याम मंचेकर आणि श्रीराम खाडिलकर यांनी परीक्षण केले
स्पर्धेत डीएनएचे छायाचित्रकार अभिनव कोचरेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, घड्याळ व रोख रक्कम 10 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. सकाळ टाइम्सचे छायाचित्रकार प्रशांत सावंत यांच्या छायाचित्राला व्दितीय क्रमांक मिळाला. त्यांनाही सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, घड्याळ व रोख रक्कम 7 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले . त्याचबरोबर निर्भय पाक्षिकचे छायाचित्रकार मिहीर हांडेपाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. तरुण भारतचे अमित भोसले यांना उत्तेजनार्थ, तर प्रदर्शनाला भेट दिलेल्या प्रेक्षकांनी निवडलेले उत्तम छायाचित्र म्हणून छायाचित्रकार विद्याधर राणे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. छायाचित्र पत्रकारिता कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार गजानन दुधळकर व ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार प्रदिप बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.