breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
छत्तीसगढमध्ये भाजपा आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला

छत्तीसगढमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात भाजपाच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा हा ताफा होता. या हल्ल्यात पाच सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली. तरीही दंतेवाडा या ठिकाणी हा हल्ला झाला आहे.
भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा हा ताफा होता. या ताफ्यावर नक्षलवादयांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच सुरक्षारक्षक जखमी झाल्याचेही समजते आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.