breaking-newsराष्ट्रिय
छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांना अटक

रायपूर – छत्तीसगडमधील बस्तर विभागात सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी दोन जण कुविख्यात असून त्यांच्यावर रोख रक्कमेचे बक्षिस जाहीर करण्यात आलेले आहेत. कांती उर्फ रामा कोराम (वय 35) याच्यावर 3 लाख रुपयांचे रोख बक्षिस जाहीर करण्यात आले होते. त्याला कोंडगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
तसेच कोशो पॉयम (वय 35) याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षिस धारण होते, त्याल बिजापूर जिल्ह्यातून गजाआड करण्यात आले. अन्य चौघांमध्ये एका महिलेचा समावेश असून या सर्वांना दंतवाडा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर सरकारी अधिकाऱ्यांचे अपहरण करणे आणि पोलिस पथकांवर हल्ला करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.