breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 7 पोलिसांचा मृत्यू

  • भूसुरुंगने पोलिसांचे वाहन उडवले 

रायपूर – नक्षलवाद्यांनी स्फोटाने पोलिसांचे वाहन उडवून दिल्याने छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे काल छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. त्याच दिवशी हा घातपात घडवून आणण्यात आला. या हल्ल्यानंतर या परिसरामध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. शहिद पोलिसांचे बलिदान लक्षात ठेवले जाईल आणि संपूर्न बस्तर विभागातील विकासकामांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

छत्तीसगड आर्म्ड फोर्स आणि जिल्हा पोलिस दलांच्यावतीने चोलनार किरानदुल रस्त्यावर गस्त घातली जात असताना दुपारी 12 च्या सुमारास भूसुरूंगाच्या आधारे हा स्फोट घडवण्यात आला. किरानदुल आणि पालनार गावादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी जाणाऱ्या ट्रकना सुरक्षा पुरवण्यासाठी सुरक्षा रक्षकांचे हे पथक जात होते. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की पोलिसांचे वाहन उडून रस्त्याशेजारच्या घळीमध्ये पडले, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच पोलिसांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघांना किरनदुल येथील नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्याहेलिकॉप्टरने रायपूरला हलवण्यात आले पण त्याचाही मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या 2 एके- 47 रायफली आणि काही इन्सास रायफलींसह, स्वयंचलित रायफलीही पळवून नेल्या. गडचिरोली, ओडिशातील मलकानगिरी आणि छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या चकमकींचा बदला म्हणून नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button