breaking-newsमहाराष्ट्र

छगन भुजबळ सोशल मीडियावर सक्रिय

ट्विटरवर अकाऊंट उघडले : लीलावतीत आज शस्त्रक्रिया
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांनी काल ट्‌विटरवर अकाऊंट उघडत सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. तुरुंगातून आणि रुग्णालयातून बाहेर आल्यावर आज त्यांनी पहिले ट्‌विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या देशभरातील चाहत्यांचे आपल्याला दिलेल्या साथीबद्दल आभार मानले.

छगन भुजबळ यांनी ट्विट केले की, माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो, माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात, याची मला कल्पना आहे. माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे, असे ट्‌वीट त्यांनी केले. @ChhaganCBhujbal या नावाने भुजबळांचं ट्‌विटर हॅंडल आहे. ट्‌विटरवर त्यांनी आतापर्यंत कुणालाही फॉलो केलेले नाही. दरम्यान, पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.

Chhagan Bhujbal@ChhaganCBhujbal

माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे

छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्‍चित झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखले जाते. भुजबळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगात होते. त्यामुळे भुजबळांसारखा धडाडीचा नेता पक्षापासून काही काळ दूर होता. आता जामीन मिळाल्याने भुजबळ पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button