breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छगन भुजबळ धमकी प्रकरण ; विविध संघटनातर्फे पिंपरीत मनुवादी समर्थकांचा निषेध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनुवादी समर्थकांकडून ” मनुस्मृती ला विरोध थांबवा अन्यथा तुमचा दाभोलकर, पानसरे करू” अशी धमकी देण्यात आली, त्याचा निषेध करण्यासाठी आज ( सोमवारी) सकाळी 11 वाजता विविध संघटनांच्या वतीने पिंपरीतील डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे ,सुरेश गायकवाड ,विश्वास राऊत ,चंद्रकांत डोके ,नंदा करे,  स्वराज अभियानचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे , नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार ,नीरज कडू ,दिलीप काकडे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रताप गुरव ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे ,अपर्णा दराडे ,डी वायएफआय चे सचिन देसाई ,शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे ,नाना फुगे ,बहुजन हिताय ग्रँथालयाचे गिरीश वाघमारे आदी विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलकांसमोर बोलताना स्वराज अभियानचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे म्हणाले की ,आपला लढा अपप्रवृत्ती विरोधात आहे .पुरोगाम्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत .हिंदुत्ववादी, सनातनी मंडळी त्याचे समर्थन करत आहेत त्यामुळे धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे याविरोधात पुरोगामी विचारांच्या संघटनांनी लढा उभारावा .प्रतिगामी विचारांचे सरकार उलथवून टाकावे असे आवाहन त्यांनी केले

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button