breaking-newsताज्या घडामोडीपुणे

च-होलीतील शाळेत ई-लर्निंग साहित्याचे वाटप

पिंपरी – च-होली येथील पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘ई-लर्निंग’ साहित्याचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समितीचे अध्यक्ष पांडूरंग पठारे, उपाध्यक्ष सुनील तापकीर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर काळजे म्हणाले, ”आजच्या माहिती तंत्रज्ञान, संगणकीकरणाच्या युगांत विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेबरोबरच संपूर्ण अद्ययावत माहिती, संगणकावरील सर्व क्रिया, कामकाज, अभ्यास याची ओळख होण्यासाठी ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता आहे. माहिती माध्यमांमध्येच विद्यार्थी गुंतून न राहता आरोग्य आणि क्रीडा यांची सांगड घालण्यासाठी क्रीडा साहित्यही उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ते दुरापास्त होऊ नये म्हणून सातत्याने असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे” जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेच्या वतीने सीएसआरच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना एलईडीटीव्ही, ई. लर्निंग साहित्य, क्रीडा साहित्याचे वाटपही महापौर काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button