breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

चेन्नई सुपर किंग्सच्या स्टार खेळाडूची निवृत्ती

नवी दिल्ली – आयपीएल 2021च्या लिलावासाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे उद्याच्या लिलावासाठी सारेच खेळाडू आणि चाहते उत्सुक आहेत. त्यातच चेन्नई सुपर किंग्सच्या एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. गेली अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्स संघाचा आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा दमदार फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डु प्लेसिसने हा निर्णय जाहीर केला.

‘माझ्यासाठी असा निर्णय घेणं खूपच कठीण होतं. पण भविष्याचा विचार करून आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. १५ वर्षांपूर्वी मला कोणी सांगितलं असतं की मी आफ्रिकेकडून ६७ कसोटी सामने खेळणार आहे आणि काही सामन्यांचे नेतृत्व करणार आहे, तर माझा माझ्यावर विश्वास बसला नसता. पण आता पुढील दोन वर्षात दोन टी२० विश्वचषक आहेत. त्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे’, अशा आशयाचं पत्र फाफ डु प्लेसिसने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button