चीन धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा देश – अमेरिका

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीन हा धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा देश बनला आहे, असे स्पष्ट करताना तिबेटमध्ये बौद्धांची अवस्था अत्यंत बिकट असून ती तशीच राहणार असल्याचेही अमेरिकेतील एक ज्येष्ठ राजकारणी सॅम ब्राऊनबॅक यांनी म्हटले आहे. सॅम ब्राऊनबॅक हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राजदूत आहेत.
तिबेटमधील बौद्ध, ख्रिश्चन आणि गालून गॉंग पंथाचे पालन करणारांना तिबेटमध्ये अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
तिबेटमधील आत्मदहन करणाऱ्या बौद्ध भिक्षुंबाबतची माहिती आणि आत्मदहन करणऱ्या बौद्ध भिक्षुंची खरी संख्या चीन जगाला कधीही कळू देत नाही असे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एका व्यक्तीने स्वत:चा गऴा कापून आत्महत्या केली आहे. टीएआर (तिबेट ऑटोनॉमस रिजन) सह संपूर्ण तिबेटामध्ये तिबेटमध्ये दलाई लामांची पूजा करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
खरं तर अशा प्रकारची बंदी घालणारा कोणताही कायदा नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार दलाई लामांचा कोणाकडेही फोटो असेल तर त्याच्याकडे पोलीस संशयाच्या दृष्टीने पाहतात. दलाई लामांचा फोटो ठेवणारा बौद्ध भिक्षू हा विभाजनवादी असल्याचा संशय घेतला जातो, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी शिनजियांमध्ये मुस्लिम, ख्रिेश्चन यांच्या 26 धार्मिक कृत्यांवर चीन सरकारने बंदी घातलेली आहे.