breaking-newsराष्ट्रिय
चिदंबरम् यांना चौकशीसाठी सीबीआयचे समन्स

नवी दिल्ली – सीबीआयने माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम् यांना चौकशीसाठी 6 जूनला पाचारण केले आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी या दाम्पत्याच्या आयएनएक्स मीडिया कंपनीत परकी गुंतवणुकीला मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेच्या आरोपावरून चिदंबरम् यांची चौकशी केली जाणार आहे.
कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए-1 सरकारमध्ये अर्थमंत्री असताना चिदंबरम् यांनी संबंधित मंजुरी दिली होती. या प्रकरणात 10 लाख रूपयांचा निधी मिळाल्याच्या आरोपावरून याआधी चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती यांना अटक करण्यात आली होती. चिदंबरम् यांना चौकशीसाठी गुरूवारीच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी इतर तारीख देण्याची विनंती केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम् यांना अटकेपासून 3 जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.