breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चिंचवडमध्ये फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन

पिंपरी- जय भवानी तरुण मंडळ आणि कालिमाता मित्र मंडळाच्या वतीने 18 ते 22 एप्रिल कालावधीत चिंचवड येथे फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजक मारुती भापकर यांनी दिली.

चिंचवड येथील दत्त मंदिर चौकात 18 ते 22 एप्रिलला दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विविध मान्यवरांचे व्याखान होणार आहे. यामध्ये बुधवारी (दि.18) ज्येष्ठ विचारवंत प्रा. तेज निवळीकर यांचे ”संत गाडगेबाबा व आजचा समाज” या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवारी (दि.19) राजकीय अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांचे ”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर- संसदीय लोकशाही” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर, शुक्रवारी (दि.20) लेखिका समुपदेशक व सामाजिक अभ्यासिका डॉ. सीमा निकम यांचे ”सोशल मिडिया- एक दुधारी शस्त्र” या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवारी (दि.21) प्रसिद्ध विचारवंत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ”स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत” या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.22) माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे ”छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकारण” या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्या व्याख्यान लाभ घ्यावा, असे आवाहन भापकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button