breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये कामगाराचा मृतदेह आढळला

चिंचवड – येथील संभाजीनगर परिसरात बीएसएनएल कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला आहे.

निलेश मुकुंद बोऱ्हाडे (वय-33, सध्या रा. यशवंतनगर, पिंपरी, मुळ गाव शिनोली, ता. आंबेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

बर्ड व्हॅलीजवळच्या बीएसएनएल कार्यालयाजवळ एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयत व्यक्तीच्या खिशात आधारकार्ड व टाटा कंपनीत कामाला असल्याचे ओळखपत्र मिळाले. ओळखपत्रावरील मोबाईल क्रमांकावर संपक4 साधला असता पोलिसांना हा मृतदेह निलेशचा असल्याचे सांगण्यात आले. निलेश याचा 14 मे रोजी पगार झाल्यानंतर तो कामावर आलाच नाही. तो गावी गेला असेल असा समज झाल्याने त्याला संपर्क न साधल्याचे त्याच्या ठेकेदाराने सांगितले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button