breaking-newsपुणे

चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

पिंपरी- चिंचवड येथील अनधिकृत बांधकामावर शनिवारी कारवाई करण्यात आली. यावेळी ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 चिंचवड, येथे अनधिकृत बांधकामे सुरु होती. या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अनधिकृत विभागाने आज हातोडा चालविला. त्यामध्ये एक वीटबांधकाम व एक आरसीसी बांधकामावर क्षेत्रफळ अंदाजे 413.33 चौरस फुटावर कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता मकरंद निकम, यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशव फुटाणे यांच्यासह इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button