चिंचवडमधील बर्डव्हॅलीच्या तलावात तरुणाचा सापडला मृतदेह

पिंपरी – महापालिकेच्या चिंचवड येथील बर्डव्हॅली उद्यानातील तलावात आज (शनिवारी) एका 25 वर्षीय तरुणाचा मृतेदह सापडला आहे. तरुणाचा मृतदेह फुगून वर आल्याने पाण्यात तरंगत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. दरम्यान, तरुणाचा खून करुन मृतदेह तलावात टाकला असल्याची पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
चिंचवड येथील बर्डव्हॅली उद्यानातील तलावात एक मृतदेह तंरगत असल्याचे नागरिकांना दिसले. तेथील नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला त्यांची माहिती दिली. यावेळी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवान अशोक कानडे, अमोल खंदारे, प्रतीक कांबळे, भूषण येवले, विनेश वाटकरे, अक्षय पाटील यांनी तलावात तरंगणा-या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. भोसरी, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी संत तुकारामनगरच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तरुणाचा खून करुन मृतदेह पाण्यात टाकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.