breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

चालायला जागाच नाही!

अनधिकृत पार्किंग, फेरीवाले यामुळे पादचाऱ्यांची अडचण; मुंबई वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; २०१८मधील अपघातांत दोनशेहून अधिक पादचाऱ्यांचा मृत्यू

रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर, पदपथांवरही होऊ लागलेले अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यांमुळे मुंबई शहरात पादचाऱ्यांना चालायला जागाच शिल्लक राहिली नसल्याचा निष्कर्ष मुंबई वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, यामुळे पादचाऱ्यांना अपघात होण्याच्या घटनाही वाढत असल्याचे समोर येत आहे. २०१८मध्ये मुंबईत झालेल्या रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या ४७५ जणांमध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण ५१ टक्के होते, असे या अहवालात म्हटले आहे.

मुंबईतील रस्ते अपघात आणि एकूण वाहतूक व्यवस्थेविषयी मुंबई वाहतूक पोलीस आणि ‘ब्लूमबर्ग फिलन्टथ्रॉपी इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ या संस्थेने केलेला सर्वेक्षण अहवाल गुरुवारी सादर करण्यात आला. त्यानुसार २०१८मध्ये रस्ते अपघातांत ४७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यात ५१ टक्के पादचारी, २८ टक्के दुचाकीस्वार, १३ टक्के दुचाकीवर मागे बसलेल्यांचा समावेश आहे. याखेरीज पाच टक्के रिक्षा व चारचाकी चालक, दोन टक्के वाहनांतील प्रवासी आणि एक टक्का सायकलस्वारांचा समावेश आहे.

मुंबईतील रस्ते अपघातांत २०१५ मध्ये ६११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात गेल्यावर्षी २२ टक्क्यांची घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, मृतांमध्ये पादचाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

रस्त्यावर व पदपथांवर उभ्या केलेल्या वाहनांमुळे चालणे अशक्य होत आहे.  त्यातच पदपथांवर फेरीवाल्यांसह अन्य काही जणांकडून अतिक्रमणही होत आहे. ते हटल्यास पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळेल, असे मत यावेळी अहवाल सादर करणआऱ्या तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. पादचाऱ्यांना रस्ते ओलांडतानाही अडचणी येतात. त्यामुळे रस्ता नेमका कोणत्या ठिकाणी ओलांडणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी एखादी ठळक खूण किंवा बोर्डही असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

शहरांतील अपघातांची धोकादायक ठिकाणे

पश्चिम द्रुतगती महामार्गावर २०१७ मध्ये ७५ अपघात झाले होते. २०१८ मध्ये हाच आकडा ५२ पर्यंत पोहोचला. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर ५३ वरून ३४ पर्यंत अपघातांचा आकडा पोहोचला आहे.

अपघात कमी होण्याची कारणे

* नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर झालेल्या कारवाईत वाढ

* दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाई, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावणे, वेगावर नियंत्रण आणण्यासाठी होणाऱ्या कारवाया

* रस्ते अपघातांबद्दल होणारी जनजागृती. खास करून जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा अधिक वापर

मृतांत तरुण अधिक

मुंबई होणाऱ्या अपघातांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अपघातांत मृत्युमुखी होणाऱ्यांमध्ये ८५ टक्के पुरुष, १५ टक्के महिला आहे. सर्वाधिक अपघातांतील मृत्यूंमध्ये २० ते २९ वयोगटातील तरुण व तरुणींचा समावेश असल्याचेही अहवालातून सांगितले आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे इत्यादींमुळे अपघात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button