Views:
116
- आमदार जगताप, लांडगेंच्या हस्ते शुभारंभ
पिंपरी – महापालिका हद्दीतील महिलांना महापालिकेमार्फत चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ आज सोमवारी (दि. 9) भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, क्रीडा-कला- साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे, नगरसदस्य विलास मडिगेरी, शितल शिंदे, नामदेव ढाके, राहुल जाधव, हर्षल ढोरे, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, विकास डोळस, नगरसदस्या आशा शेडगे आदी यावेळी उपस्थित होते.
एकनाथ पवार म्हणाले की, महापालिका हद्दीतील महिला सक्षम बनल्या पाहिजेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी महापालिकेकडून महिलांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.
महिला वाहन प्रशिक्षणासाठी ७ हजार ८५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १ हजार ७४४ पात्र महिलांना पहिला टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ हजार ६०० पात्र महिलांना वाहन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर यांनी दिली.
Like this:
Like Loading...