Mahaenews

चापेकर बंधूंचा 119 वा स्मृतिदिन समारोह मोठ्या उत्साहात

Share On

पिंपरी –  क्रांतिवीर चापेकर बंधूचा 119 वा स्मृतिदिन समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-लेझीम, झांज पथकांच्या जयघोषात रथामध्ये दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हरी चापेकर बंधू, महादेव रानडे, शिवाजी महाराज व मोरया गोसावी यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी घेऊन अभिवादन फेरी चिंचवडगावातून काढण्यात आली.  

चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर वाड्यात बुधवारी (दि.18) झालेल्या कार्यक्रमाला साहित्याच्या अभ्यासक गीता उपासनी, मुरलीकांत पेटकर, स्मारक समितीचे अध्यक्ष गिरिश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे उपस्थित होते.  यावेळी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या प्रांगणातील क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन फेरीची सुरुवात झाली. ढोल, लेझीम, झांज पथकांच्या जयघोषात रथामध्ये दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हरी चापेकर बंधू, महादेव रानडे, शिवाजी महाराज व मोरया गोसावी यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी घेऊन अभिवादन फेरी वाजत गाजत चिंचवडगावातून  काढण्यात आली. चिंचवड चौकातील चापेकर बंधूंच्या समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन फेरी चापेकर वाड्यात सायंकाळी सहा वाजता पोहचली. क्रांतिवीर चापेकर वाड्यात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अभिवादन सोहळा संपन्न झाला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. नीता मोहिते यांनी केले. तर अशोक पारखी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version