breaking-newsमनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सुनील शेट्टीची एन्ट्री

‘चला हवा येऊ द्या”च्या इतिहासात आजपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावत, मराठी भाषा बोलून रसिकांचे तुफान मनोरंजन केले. आमिर, शाहरुख, सलमान नंतर प्रतीक्षा होती ती फिट अँड फाईन हिरो ‘सुनीलशेट्टी’ मंचावर आला तो आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन साठी. ‘अबक’ या मराठी चित्रपटात प्रेक्षक सुनील शेट्टीला मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहेत. यावेळी चला हवा येऊ द्या टीम ने ‘धडकन’ या चित्रपटावर स्किट करूनधमाल उडवून दिली. या कार्यक्रमासाठी संगीतकार साजिद अली तसेच अमृता फडणवीस हे प्रमुख अतिथी देखील उपस्थित होते.

पहिल्यांदाच सुनील शेट्टीने एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावत थुकरटवाडीत फुल ऑन धमाल केली. विशेष म्हणजे कुशल बद्रिकेने सुनील शेट्टीचा कमल बेअरिंग पकडून सर्वाना पोट धरून हसायला भाग पाडले. येत्या सोमवार आणि मंगळवारी ४ आणि ५ जून ला रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’ चा हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button