चंद्रोस चषक स्पर्धेत ओम साई संघाचा विजय

पिंपरी – चंद्रोस क्रिकेट ऍकॅडमीच्या वतीने 11 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रित चंद्रोस चषक क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी ओम-साई संघाने गायकवाड क्रिकेट संघावर 18 धावा व 2 विकेट राखून सहज विजय नोंदवला.
या सामन्यात ओम-साई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 118 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गायकवाड संघाने निर्धारीत 20 षटकात 6 गड्यांच्या बदल्यात 100 धावा केल्या. तसेच तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात कॅमब्रीज संघाने चंद्रोस संघाचा 37 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅमब्रीज संघाने निर्धारीत 20 षटकात 127 धावा केल्या. 127 धावांचा पाठलाग करताना चंद्रोस संघाला 90 धावाच बनवता आल्या.
चंद्रोस संघाकडून गगनदीप पाल्हे, मल्हार सोर्टे, जय धुमाळ यांनी चांगली कामगिरी केली. मात्र या सामन्यात अथर्व भोसले याने कॅमब्रीज संघासाठी खेळताना वैक्तीक नाबाद 64 धावांची खेळी करत एका खेळाडूला धावबाद केले. तसेच गोलंदाजी करताना 1 विकेट कमावली. अथर्व भोसले याला सामनावीर घोषीत करण्यात आले.