breaking-newsआंतरराष्टीय

चंद्रावरील मोहिमेसाठी चीनचा उपग्रह प्रक्षेपित

बीजिंग  : आतापर्यंत फारशी माहिती न मिळालेल्या चंद्राच्या दुसऱ्या बाजूचा अभ्यास करण्यासाठी चीनने सोमवारी उपग्रह प्रक्षेपित केला. या मोहिमेमध्ये चंद्रावर ‘रोव्हर’ उतरविण्यात येणार आहे.  ‘क्वेकियाओ’ असे या उपग्रहाचे नाव असून, त्याचे वजन ४०० किलो आहे. त्याचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.

चीनच्या नैऋत्य भागातील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून ‘लाँग मार्च-४ सी’ या प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या मोहिमेविषयी उपग्रह प्रकल्पाचे व्यवस्थापक झांग लिहुआ म्हणाले, ‘हे प्रक्षेपण चीनसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. चंद्राच्या दुसऱ्या बाजूवर एखादे उपकरण उतरविणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे.’  प्रक्षेपणानंतर २५ मिनिटांमध्ये हा उपग्रह प्रक्षेपकापासून वेगळा झाला आणि आता त्याने २०० किलोमीटर ते चार लाख किलोमीटर या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हा उपग्रह पृथ्वीपासून चार लाख ५५ हजार किलोमीटर कक्षेत प्रवेश करणार असून, या कक्षेमध्ये जाणारा हा पहिलाच उपग्रह असेल.

या उपग्रहावर अनेक अँटेना असून, त्यातील एका अँटेनाचा व्यास पाच मीटर आहे. दूरवरच्या अवकाश मोहिमांमध्ये संदेशांसाठी वापरण्यात आलेला हा सर्वांत मोठा अँटेना असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये अनेक वेळा कक्षांमध्ये बदल करण्यात येणार असून, चंद्राजवळ गेल्यानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत मार्ग निवडणे हेही मुख्य आव्हान असेल, असे झांग यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button