चंद्रकांत दादा ; भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करा – मुंडे
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करते, त्यावेळी सत्तेचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचे काम केले जाते, चंद्रकांत दादा यांनी आम्हाला धमकी देण्यापेक्षा स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करावी, असा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबई येथील भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या टिकेला धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले. हल्लाबोल यात्रेप्रसंगी पंढरपूरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, आजच्या दिवशी स्थापना दिवस साजरा करण्यापेक्षा चार वर्षे जनतेची फसवणूक केली आहे. आज २८ -२८ रेल्वे द्वारे माणसे आणून भाजपा आता स्वतःचीच फसवणूक करीत असल्याचे ते म्हणाले . तसेच शिवसेनेने सत्तेचा लाभ घेऊन पुन्हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी विरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे या दूटप्पी भूमिकेला अजितदादा यांनी गांडूळासारखे दुतोंडी म्हटले तर बिघडले कुठे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.