breaking-newsताज्या घडामोडीपुणे

घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न ; महिलेची बाल्कनीतून उडी

पिंपरी – नालासोपारा येथील छेडछाडीपासून सुटका करुन घेण्यासाठी इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारली. ही घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. महिलेच्या घरात घुसून महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. त्या नराधमाच्या तावडीतून सुटका  करुन घेण्यासाठी सदरील पीडित महिलेने बाल्कनीतून खाली उडी मारली आहे. दरम्यान, पीडित महिला बाल्कनीतून  थेट खाली उभा केलेल्या चार चाकीवर वाहनावर  पडली. त्या पीडित महिलेवर उपचारासाठी  रुग्णालयात दाखल केले असून  तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी विरोधात वाकड पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button