breaking-newsताज्या घडामोडीपुणे

घरफोडी प्रकरणात दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे– येरवडा, लक्ष्मीनगर भागात घरफोडी करून 69 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी दोघांच्या पोलीस कोठडीत 20 मेपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अश्रफ अन्वर शेख (वय 26), अतुल सुधाकर कांबळे (वय 21, दोघेही, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मीनगर, येरवडा भागात राहणाऱ्या 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 27 एप्रिल आणि त्यापूर्वीच्या एक महिन्याच्या कालावधीत घडली. घरफोडी करून फिर्यादीच्या घरातील 69 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने येरवडा पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील दागिने जप्त करण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button