breaking-newsपुणे
घरफोडी करून 5 लाख 18 हजाराचा ऐवज लांबविला
पुणे – घरफोडी करून 5 लाख 18 हजार 750 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. ताडीवाला रस्त्यावरील विनायकनगरी, 13 येथे ही घटना घडली. याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादींचे घर बंद होते. त्यावेळी बनावट चावीच्या सहायाने कुलूप उघडून अनोळख्या व्यक्तींनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील रोख 2 लाख 50 हजार रुपये आणि सोने, डायमंडचे दागिने मिळून 5 लाख 18 हजार 750 रुपयांचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.ए.गायकवाड अधिक तपास करत आहेत.