breaking-newsराष्ट्रिय
घटस्फोट घेण्यासाठी ‘हे’ कारण पुरेसं असू शकत

चंदिगढ : पत्नीच्या वर्णावरुन तिला हिणवणं महागात पडू शकतं. पतीने ‘काली कलौती’ म्हटल्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महिलेला घटस्फोट देण्यास परवानगी दिली. महेंद्रगडमध्ये राहणाऱ्या संबंधित महिलेचा पतीसोबत स्वयंपाकावरुन वाद झाला होता. त्यानंतर पतीने तिला इतरांसमोर रंगावरुन टोमणा मारला. अपमानास्पद वागणुकीमुळे तिने कोर्टात घटस्फोटाची मागणी केली होती.
न्या. एमएमएस बेदी आणि न्या. गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने महिलेला घटस्फोटासाठी परवानगी दिली. महिलेला तिच्या वर्णावरुन चिडवणं, ही क्रूर वागणूक असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. पत्नीला लज्जास्पद वागणूक देऊन तिला सासर सोडण्यास भाग पाडण्यात आलं, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं