breaking-newsपुणे
ग्राहक पेठेत चोरी; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

पुण्यातील प्रसिध्द ग्राहक पेठेत अज्ञात चोरट्याने चोरी केली असून दोन लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार 23 आणि 24 मेच्या मध्यरात्री घडला.
याप्रकरणी उदय जोशी (वय-42, रा.कसबा पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ग्राहक पेठेतील ग्रॉसरी विभागाच्या पाठीमागे असणा-या दरवाजाच्या फटीमधून अथवा दुस-या मजल्यावरील टेरेसवर केलेल्या ग्रिलच्या उघड्या जागेतून प्रवेश करत ही चोरी केली. चोरट्यांनी रोख 30 हजार रुपये, सोन्याची नाणी, सीसीटीव्ही कॅमेरा, डी.व्ही.आर मशिन असा एकूण दोन लाख 29 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.