ग्रामीण डाक सेवा विस्कळित होणार

- डाक सेवक जाणार बेमुदत संपावर
पुणे – आपल्या विविध मागण्यासाठी देशभरातील ग्रामीण डाक सेवकांनी उद्यापासून(मंगळवार) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.या संपात पुणे शहर आणि जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक डाक सेवक सहभागी होणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात डाक सेवा विस्कळित होणार आहे.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना आणि नॅशनल युनीयन ऑफ ग्रामीण डाक सेवक यांच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. ग्रामीण व शहरी डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करावा ही प्रमूख मागणी सेवकांची आहे.याशिवाय निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे इतरही काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत,यासंदर्भात आज प्रशासनाबरोबर संघटनाची चर्चा सुद्धा पण प्रशासनाने फक्त आश्वासन दिले.त्यामुळे अखेर संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले.
ते म्हणाले,यापुर्वी जुलै महिन्या आम्ही संप केला होता त्यावेळी सात दिवस संपावर गेलो होता.यावेळी आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आले होते, त्याचबरोबर सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती पण या समितीचे साधे कामकाज सुद्धा अद्याप सुरु झालेले नाही.त्यामुळे आता आम्ही पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या संपात पोस्ट खात्यातील तीन संघटना सहभागी होणार आहे.देशभरात 2 लाख 70 हजार डाक सेवक आहेत.हे सर्व जण संपावर जाणार आहेत पुणे शहर आणि जिल्हा मिळून पंधराशे हून अधिक डाक सेवक आहे.हे सर्वजण संपात सहभागी होणार आहेत यामुळे आता उद्यापासून ग्रामीण भागातील टपाल सेवा पुर्ण ठप्प होणार आहे. पत्राचे वाटप तसेच इतर संदेश पोहचविण्याचे काम ग्रामीण भागात या डाक सेवकांमार्फतच होत असते आता ते ठप्प होणार आहे.हा संप किती काळ सुरु राहील याचा अंदाज नसल्याने त्याचा परिणाम ग्रामीण नागरिकांवर होणार आहे.