breaking-newsराष्ट्रिय
गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक

बंगळुरू – पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना विशेष तपास पथकाने अटक केली आहे. अमित रामचंद्र बड्डी आणि गणेश मिस्की अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोन संशयितांना हुबळीतून अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी 20 जुलैला सातव्या संशयिताला अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला जून महिन्यात अटक करण्यात आली. गतवर्षी 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोराने हेल्मेट घालून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या.