breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गोव्याच्या राज्यपालांवर दबाव आणण्यासाठी कॉंग्रेसची प्रदेश यात्रा

पणजी – कर्नाटकात तेथील राज्यपालांनी सर्वाधिक जागा मिळवलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी प्रथम पाचारण केले तशीच संधी आम्हाला गोव्यातील राज्यपालांनी द्यावी अशी मागणी कॉंग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे केली असून त्याबाबतीत राज्यपालांवर जनमताचा दबाव आणण्यासाठी कॉंग्रसने आता राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्यावेळी राज्यातील भाजप सरकारच्या अपयशाबद्दलही जनतेत जागृती केली जाणार आहे.

कर्नाटक प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने गोव्यातील भाजप सरकारच्या पुढे पेच निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठाच दबाव राज्यपालांवर आणण्याचे तंत्र गांभीर्याने अवलंबले आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सेक्रेटरी डॉ ए चेल्लाकुमार यांनी सांगितले की राज्यपालांनी मनोहर पर्रिकर सरकार बरखास्त करून आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली नाहीं तर आम्ही राज्यव्यापी आंदोलने करू.

कॉंग्रेसने आज या संबंधात काढलेल्या राज्यव्यापी यात्रेला प्रारंभ केला. पक्षाची ही यात्रा राज्यातील सर्व 40 विधानसभा मतदार संघात जाणार आहे. गोव्यात आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने आम्हालाच येथे राज्य सरकार स्थापन करण्याची संधी दिली गेली पहिजे असे चेल्लाकुमार म्हणाले. ही संधी मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीं असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button