breaking-newsराष्ट्रिय
गोव्याच्या कळंगुट बीचवर अकोल्यातील पाच जण बुडाले

पणजी: गोव्यातील कळंगुट बीचवर पाच जण बुडाले आहेत. यामधील तिघांचे मृतदेह मिळाले असून दोघांचा शोध सुरु आहे. बुडालेले पाच जण अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी उमरी, विठठ्ल नगर अकोला येथील 14 जणांचा ग्रुप गोव्यामध्ये रेल्वेने आज सकाळी साडे-चार वाजता आला होता. सकाळी मडगाव रेल्वे स्टेशनवरुन ते टॅक्सीने कळंगुट बीचवर पोहचले. अंघोळीसाठी गेले असता पाज जण बुडाले. यामधील तीन जणांचे मृतदेह मिळाले असून दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.