breaking-newsमुंबईराष्ट्रिय

गोविंदा स्टाईल डान्स करणारे काका नेमके आहेत तरी कोण ?

मुंबई : कालपासून सोशल मीडियावर गोविंदा स्टाइलने अगदी बिनधास्तपणे नाचणाऱ्या एका काकांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. काकांच्या डान्सने सोशल मीडियावर धमाकूळ घातला असून कित्येकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे. अगदी एकाच दिवसात व्हिडीओतील काका सोशल मीडियावर हिट झाले आहेत. पण हे काका नेमके आहेत तरी कोण ?  चला आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देतो…

संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू असे त्यांचे नाव असून ते भोपाळच्या विदिशामध्ये राहणारे आहेत. भाभा विद्यापिठात ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. संजीव यांनी नागपूरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच त्यांचा डान्सची आवड आहे. त्यांनी अनेक डान्स शोमध्येही भाग घेतला. संजीव 1982 पासून डान्स करत आहेत. नृत्याची प्रेरणा त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून मिळाली. गोविंदाच्या ‘लव 82’ हा सिनेमा त्यांना अतिशय आवडतो. त्यांनी मध्य प्रदेशात अनेक नृत्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रथन पारितोषिकही मिळवले आहे. ‘एमटेक’चे शिक्षण घेतलेल्या संजीव यांनी 1998साली नृत्याची आवड सोडून प्रोफेसर म्हणून काम करायला सुरूवात केली.

‘मला सकाळी फोन करून डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगितले. हा व्हिडीओ 12 मे रोजीचा आहे. माझ्या मेहुण्याच्या लग्नातील हा व्हिडीओ आहे. मी आता 46 वर्षांचा आहे. असे काही होईल याची मला कधीच कल्पना नव्हती. लहानपणापासून मला गोविंदा, ऋषी कपूर यांच्या गाण्यांवर डान्स करायला अतिशय आवडतो, असे संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button