breaking-newsमनोरंजन
गोविंदा स्टाईल डान्सचा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ होतोय व्हायरल

लग्न समारंभ किंवा पार्टी म्हटली की ती डीजेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आपल्या फेवरेट गाण्यावर ठेका धरायला खरं तर वयाचं बंधन लागत नाही. चार वर्षांच्या चिमुरड्यापासून आजी-आजोबांपर्यंत सगळेच जण आपल्या काळातील आपल्या आवडीच्या कलाकाराच्या गाण्यावर बेभान नाचतात.
गोविंदा आणि निलम यांच्या ‘खुदगर्ज’ (1987) चित्रपटातलं ‘दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से’ हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होतं. मोहम्मद अझिझ-साधना सरगम यांच्या आवाजातील या डान्स नंबरला गोविंदाने पुरेपूर न्याय दिला होता. गोविंदाची डान्सिंग स्टाईलही होतीच हटके. ही स्टाईल अगदी हुबेहूब करुन दाखवणारे एक ‘काका’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काका म्हणायला फक्त वयापुरते.. त्यांचा जोश, त्यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी..