breaking-newsराष्ट्रिय
गाळप गिरण्यांकडून खरेदी वाढल्याने मोहरी, सोयाबीन तेलाचे भाव वाढले

लखनौ : वनस्पती तेल उद्योगांकडून खरेदी वाढल्याने खाद्य तेल आणि तेलबिया बाजारात मोहरी आणि सोयाबीन तेलाचे घाऊक बाजारातील भाव ५० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना काही अंशी फटका सहन करावा लागत आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनस्पती गिरण्यांकडून खरेदी वाढल्याने आणि उत्पादक प्रदेशातून पुरवठा बंद असल्याने मोहरी आणि सोयाबीन तेलाचे भाव वाढले आहेत.
राजधानी नवी दिल्ली येथे, मोहरी एक्सपेलर (दादरी) चे भाव ५० रुपयांनी वाढून ७,७०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचले. सोयाबीन रिफाइंड गिरणी पुरवठा (इंदौर) आणि सोयाबीन डेगम (कांडला) तेलाचे भाव प्रत्येकी ५० रुपयांनी वधारत ते प्रत्येकी अनुक्रमे ७,६०० रु. आणि ७,२०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचले.