गायींचे मास खाण्याचे टाळले तर हिंसाचार कमी होईल

- रा.स्व. संघाचे नेते इंद्रेशकुमार यांचे प्रतिपादन
रांची – लोकांनी गायीचे मांस खाण्याचे टाळले तर हिंसाचार आपोआप कमी होईल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी केले आहे. अलिकडेच गोहत्या केल्याच्या आरोपावरून अनेकांच्या हत्या करण्याचे प्रकार घडले आहेत त्या विषयी प्रतिक्रीया देताना त्यांनी वरील विधान केले. ते म्हणाले की कोणत्याही धर्मात गायींच्या हत्येचे समर्थन करण्यात आलेले नाही त्यामुळे लोकांनी गायींच्या हत्या टाळाव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अलिकडेच सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला त्यावर प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी म्हटले आहे की कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. स्वामी अग्निवेश यांनी हिंदुंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर 17 जुलै रोजी झारखंडमधील पकुर येथे हल्ला झाला होता व त्यात त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती.