breaking-newsमुंबई

‘गंगाधरही शक्तीमान है’, राज-शरद पवार भेटीवर भाजपाचा निशाणा!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू असून आपल्या सभांमधून ते भाजपची पोलखोल करत आहेत. नांदेड, सोलापूरमध्ये झालेल्या सभा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनल्या असताना आता एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुक्काम होता त्याच हॉटेलमध्ये राजही थांबले होते. शिवाय या दोघांची भेट झाली असून काँग्रेसचे सोलापूर येथील उमेदवार सुशीलकुमार शिंदेही यावेळी उपस्थित होते. या भेटीवरून भाजपाने निशाणा साधला आहे.

‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे. कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असे ट्विट भाजप महाराष्ट्रने केले आहे.

 

राज यांची सोलापूरमधील सभा चांगलीच गाजली. भाजप सरकार हे फसवे सरकार असल्याचे म्हणत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच भाजपाच्या डीजिटल इंडियाच्या हरिसाल गावाच्या जाहिरातीमधील मॉडेल व्यासपीठावर आणला होता. त्यामुळे राज यांची सोलापुरातील सभा वेगळीच ठरली आहे. दरम्यान, राज ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. राज यांचा सोलापूर तर शरद पवार यांचा उस्मानाबाद दौरा एकाच दिवशी होता. या दोन्ही नेत्यांच्या सभा आजुबाजुच्या जिल्ह्यात झाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button