breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

खुशखबर : रेल्वेचं तिकीट काढलं नाही… घाबरू नका!

नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा रेल्वे सुरू होणार असते, आणि तुम्हाला तिकीट खिडकीवरच्या रांगेमुळे तिकीटच मिळत नाही, अशावेळी तिकीटाशिवाय रेल्वेत तुम्ही चढलात तर दंड भरावा लागतो… आता यावरच रेल्वेनं एक नवा उपाय काढलाय.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही घाईत असाल तर तुम्ही रेल्वे प्रवासादरम्यानही तिकीट घेऊ शकाल. यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे फुकट्या प्रवाशांना वेगवेगळी कारणं देता येणार नाहीत.

कसं आणि कुठे मिळणार तिकीट?

एप्रिल महिन्यापासून रेल्वेनं गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था सुरू केलीय. यासाठी तुम्ही प्रवास करत असलेल्या टीटीईशी तुम्हाला संपर्क करावा लागेल. त्यांना आपण तिकीटाशिवाय प्रवास करत असल्याचं सांगून त्याच्याकडूनच तुम्हाला तुमचं तिकीट घ्यायचंय. टीटीई तुमच्याकडून तिकीटाच्या शुल्काव्यतिरिक्त १० रुपये अतिरिक्त शुल्क घेऊन आपल्या हातातील मशिनवरून तिकीट काढून देईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button