breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खिळे मुक्त अभियानात सरसावले वृक्षप्रेमी

पिंपरी – जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे. त्यासाठी खिळेमुक्त झाडे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवारी (दि. ८) ७० झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. दोन किलो खिळे काढून झाडांना वेदनामुक्त करण्यात आले.
शहरात खिळेमुक्त झाडे, ‘नेल फ्री ट्री, पेन फ्री ट्री’ या अभियानांतर्गत ‘मी पाणी अंघोळीची गोळी’ यांच्या वतीने निगडी प्राधिकरणातील भेळ चौक ते काचघर चौक मार्गावर असणाऱ्या झाडांचे जवळपास दोन किलो खिळे काढले. प्रत्येक मंगळवारी चालणाºया या अभियानाची प्रेरणा घेऊन कै़ तुकाराम प्रतिष्ठानने हाच उपक्रम रविवारीसुद्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘अंघोळीची गोळी’मार्फत हा उपक्रम राबवला जात आहे.

संभाजीनगर येथील ३८ झाडांना खिळेमुक्त केले आणि झाडांच्या संवर्धनाची आणि संवेदनांची गुढी उभारली. झाडांचे आयुष्य वाढविण्याच्या उद्देशाने झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी ‘खिळेमुक्त झाडे’ असे या उपक्रमाचे नाव असून याद्वारे शहरातील झाडे खिळेमुक्त केली जाणार आहेत. झाडांना वेदनामुक्त करण्याचा छोटा पण एक प्रामाणिक प्रयत्न आंघोळीची गोळी ह्यूमन सोसायटी, तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र संघटना, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, यांचे ४० सभासद सहभागी झाले. त्यात दोन तास हा उपक्रम करण्यात आला. त्यात ३२ झाडे खिळेमुक्त करण्यात आले.
महादेव पाटील, अनिल पालकर, अशोक तनपुरे, संदीप सकपाळ, लक्ष्मण शिंदे, नितीन मोरे, नकुल टळले, फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, अरुण पाटील, बंटी सकपाळ, स्वाती पालकर, उल्हास टाकले, सूर्यकांत मूथीयान, समाधान पाटील, विठ्ठल सहाणे यांनी सहभाग घेतला़ येथून पुढे शहरातील विविध ठिकाणी तुकाराम तनपुरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत खिळेमुक्त झाडे अभियान यांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे अशोक तनपुरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button