breaking-newsताज्या घडामोडीपुणे

क क्षेत्रीय कार्यालयावर महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

बहूजन रिपब्लिक सोसालिस्ट पार्टीचे आंदोलन

पिंपरी- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील बालाजीनगर, खंडेवस्ती परिसरात ऐन उन्हाळात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी टंचाई होवू लागली आहे. याकडे प्रभाग क्रमांक आठ मधील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करु लागले आहेत. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालयावर आज (गुरुवारी) महिला व नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासह विविध मागण्यांसाठी हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीतील प्रभाग आठचे अध्यक्ष महेंद्र सरवदे, ईश्वर कांबळे, नितीन कसबे, आकाश ठुमरे, प्रेम जवजांळ, रामभाऊ ठोके, सुमित्रा कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देवून निषेध व्यक्त केला.
क क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी प्रदीप मुथा यांना बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक आठ मध्ये बालाजी नगर परिसरातील ड्रेनेज लाईन खराब झाल्याने दुषित पाणी घरामध्ये येवू लागले आहे. त्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, खंडेवस्ती परिसरात पाण्याची बिकट टंचाई जाणवत आहे. तेथील पाणी पुरवठा सुरळीत करावा, बालाजीनगर मधील रस्त्यांची दुरवस्ती झाल्याने तेथील रस्ते दुरुस्त करावेत आणि सार्वजनिक शैाचालयांची स्वच्छता न केल्याने तेथे दुर्गंधी सुटली आहे. अनेक शैाचालये ब्लॅाक झाली आहे त्या शैाचालयांची साफसफाई करुन स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या आठ दिवसात सदरील मागण्यांवर कार्यवाही न केल्यास क क्षेत्रीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button