breaking-newsक्रिडा

क्‍लबचे अध्यक्ष हेच माद्रीद सोडण्याचे मुख्य कारण – रोनाल्डो

पॅरिस – पाच वेळचा मानाच्या ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डो याला यंदाच्या वर्षीही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. फ्रान्स फुटबॉल मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपला अगोदरचा क्‍लब रियाल माद्रीदला जुवेन्टस क्‍लबसाठी का सोडले ? याचे कारण सांगितले आहे. त्यात तो माद्रीदचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ त्यांच्यावर टीका करत म्हणाला, माद्रीदचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांना मी संघाचा अभिवाज्य घटक वाटत नव्हतो.

मी क्‍लबचा अविभाज्य घटक नाही. अश्‍या प्रकारची भावना मला क्‍लबकडून , विशेषतः क्‍लबचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांच्या वर्तनातून दिसत होती. मला जे सांगायचे हे तुम्हाला समजले असेल तर हेच माझे क्‍लब सोडण्याचे मुख्य कारण होते. माद्रीद मधील कारकिर्दीच्या सुरूवातीच्या 4-5 वर्षाच्या कालावधीत मला ख्रिस्तियानो रोनाल्डो असल्याचे भासत होते. परंतु, नंतर ते कमी होत गेले.

33 वर्षीय या पोर्तुगीज खेळाडूने जुलैमध्ये जुवेन्टस क्‍लबसाठी 100 मिलियनचा करार करत माद्रिदला राम-राम ठोकला होता. त्याने माद्रीदसाठी शेवटचा सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिमसामना खेळला होता. तो सामना जिंकत माद्रिद संघाने विजेतेपद पटकावले होते. या सामन्यानंतर माद्रीदचे प्रशिक्षक झिनेदीन झिदान यांनी त्यांचे पद सोडले होते.
झिदान यांनी प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोडली याचा परिणाम त्याच्या निर्णयावर झाला नाही असे सांगताना रोनाल्डो पुढे म्हणाला, माझा माद्रीद क्‍लब सोडण्याचा निर्णय हा झिदानच्या निर्णयामुळे घेतला गेला नाही. परंतु, यामुळे मला बारकाईने विचार करता आला की माझे क्‍लबमधील स्थान कसे असेल.

‘बॅलोन डी ओर’ पुरस्कारा विषयी बॉईलटणा तो म्हणाला, हा पुरस्कार मिळवण्यास मी स्वतःला पात्र समजतो. त्याचबरोबर हा पुरस्कार जिंकणार्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे लियोनेल मेस्सी सह पहिल्या स्थानावर असणारा रोनाल्डो हा पुरस्कार सहाव्या वेळा जिंकण्याबाबत आशावादी आहे. मैदानावर गोलचा पाऊस पाडणारा रोनाल्डो सध्या खाजगी आयुष्यात बलात्काराच्या आरोपांमुळे देखील चर्चित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button