breaking-newsआंतरराष्टीय
क्युबामध्ये विमान कोसळून 100 ठार

उड्डाण केल्यानंतर विमान एका सुपर मार्केटवरून अगदी कमी उंचीवरून उडत गेले. तेथे विमान कोसळले असते तर मोठी जिवीत हानी झाली असती. वैमानिकाने इमर्जन्सी लॅंडिंग करण्याचा प्रयत्न केला असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. क्युबाचे अध्यक्ष मायग्युएल डिएझ कॅनेल यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले. विमान कोसळण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या दुर्घटनेमुळे क्युबामध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.