breaking-newsपुणे

क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाला सुरुवात

पिंपरी –  महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 11 ते 14 एप्रिल 2018 दरम्यान आयोजित केलेल्या प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. 

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सुरू असलेल्या या महोत्सवाचे उद्‌घाटन सायंकाळी सहा वाजता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस आणि पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्र, पुणे व महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. लक्ष्मण माने यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सुरु आहे. दुपारी बारा वाजता धीरज वानखेडे प्रस्तूत ‘प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता सागर तरकसे यांचा ‘प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम’ सादर होणार आहे. सायंकाळी चार वाजता शाहीर देवानंद माळी, सांगली यांचा ‘प्रबोधनात्मक शाहिरी जलसा’ कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता प्रा. नामदेवराव जाधव यांचे ‘प्रबोधनपर्वाचे उद्घाटन’ होईल. सायंकाळी आठ वाजता भाऊसाहेब पाटील यांचा स्वयंदीप मुंबई निर्मित ‘असूड’ म.फुले यांच्या जीवनावर आधारित धगधगता नाट्यविष्कार सादर होणार आहे.

गुरुवारी (दि.12) एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शाहीर माणिक कांबळे यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा सादर होणार आहे. दुपारी बारा वाजता पत्रकार संजय आवटे, प्राचार्य एकनाथ बुरसे, रमेश पांडव, प्रविण रणसुरे, डॉ. विजय खरे, अभिषेक भोसले, जयदेव डोळे, अॅड. वसंत कांबळे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ या विषयावरील परिसंवादात सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता सुधाकर वारभुवन यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर होईल.

सायंकाळी चार वाजता प्रबोधनात्मक कवि संमेलन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता संजय गाडे यांचा ‘बा भीमाची पुण्याई- ऑर्केस्ट्रा’ सादर होईल. सायंकाळी साडेसात वाजता प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांचे ‘भिमा तुझा जन्मामुळे-नाटक’ सादर होणार आहे. शुक्रवारी (दि. 13) एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शेखर गायकवाड यांचा भिमराव विश्वरत्न कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता विजय इंगोले, अकोला यांचा ‘प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम’ सादर होईल. दुपारी एक वाजता जयभीम शिंदे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी तीन वाजता कवी मेघानंद जाधव यांचा ‘परिवर्तनाचा वादळ वारा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता खासदार अमर साबळे, राजाभाऊ भैलुमे, प्रा. प्रकाश पवार, डॉ.प्रतिभा आहिरे, औरंगाबाद, विद्या भोरजारे, मुंबई, प्रा. शुभांगी शिंदे, फलटण, अॅड. पायल गायकवाड, दिल्ली हे क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांविषयक धोरण या विषयावरील “परिसंवादात संविधान जणजागर अभियान” अंतर्गत सहभागी होणार आहेत.

सायंकाळी साडेसहा वाजता विजयकुमार गवई, जॉली मोरे, शाहीर सिमा पाटील यांचा “संगीतमय नाट्यकृती, अविस्मरणीय आंबेडकरी संवाद वुई द पिपल हा कार्यक्रम सादर होईल. रात्री साडेआठ वाजता सुप्रसिद्ध गायक व गायिका रेश्मा सोनवणे व राहुल सक्सेना यांचा “प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम” सादर होणार आहे. शनिवारी (दि.14) एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता प्रसिद्ध गायक राहुल भोसले, प्रियांका जाधव, विनल देशमुख, सुजाता जोशी व सहकारी यांचा आरोही प्रस्तूत “निळी पहाट” हा कार्यक्रम सादर होणार आहे. सकाळी नऊ वाजता विशाल ओव्हाळ यांचा “प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम” सादर होणार आहे. सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनपा प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस तर सकाळी सव्वा दहा वाजता पिंपरी चौकातील क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.

सकाळी अकरा वाजता उल्हास तुळवे, अमोल भोसले यांचा “ऑर्केस्ट्रा ह्रिदम स्टार्स” हा कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी एक वाजता प्रसिद्ध सप्त खंजिरी वादक तुषार सूर्यवंशी, नागपूर यांचा “तुषारची तृप्त्वानी-सप्त खंजिरी वादन” कार्यक्रम सादर होईल. दुपारी तीन वाजता धम्मज्योती शिंदे यांचा “प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम” सादर होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता अजय देहाडे, डॉ. गणेश चंदनशिवे यांचा “तुफानातले दिवे”(जलसा) हा कार्यक्रम सादर होणार आहे. रात्री साडेआठ वाजता अमित माळकरी यांचा “सॅन्ड आर्ट सादरीकरण” हा कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा “प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम” होऊन प्रबोधन पर्वाची सांगता होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button