कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला ; ग्रामस्थांची हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार

- हातकणंगले तालुक्यातील 100 नागरिक पोलीस ठाण्यात दाखल
- तक्रारीबाबत पोलीसही झाले अवाक
- पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळ
कोल्हापूर – कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार आज हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीचा विषय पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यातील कर्मचारी आवक झाले. 100 हुन अधिक ग्रामस्थ पोहण्याचे साहित्य, मच्छीमारीची जाळी, मच्छीमारीची डालगी घेऊन थेट पोलीस ठाण्यात आल्याने
मोठा गोंधळ उडाला.
पंचगंगा नदी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी हिरव गवत उगवलं असून पाण्याने भरलेली आपली पंचगंगा चोरीला गेली आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते.
तक्रार दाखल होत नसल्याचे सांगताच ग्रामस्थ आणि पोलिसांत बाचाबाची झाली. दोन तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्याचा तक्रार अर्ज स्वीकारला यावेळी आमची नदी ज्यांनी चोरली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आमची नदी आम्हाला परत करावी अशी मागणी केली.
पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार जरी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली असली तरी या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोल्हापूरची पंचगंगाप्रदूषित झाली आहे. पाण्याच्या जागेवर कित्तेक किलोमीटरवर जलपर्णीचा विळखा झाला आहे. आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सुस्त बसून आहे. झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज हातकणंगले ग्रामस्थांना पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार द्यावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.