Views:
425
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील आकुर्डे गावात भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात रान गव्याच्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले गारगोटीचे बी न्यूजचे प्रतिनिधिही गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आकुर्डे येथील तीन तरुण वैरण म्हणून ऊसाचा पाला काढण्यासाठी ऊसाच्या शेतात गेले होते. यावेळी गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. पोटात गव्याचे शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने अनिल पोवार हा तरुण शेतकरी जागीच ठार झाला. जीव वाचवत पळालेल्या दोघांनी ग्रामस्थांना या दुर्घटनेची माहिती दिली. हे वृत्त कळताच बी न्यूजचे रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते. बांधावर उभे राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना थेट धडक दिली. यामुळे ते १०-१२ फूटवर दूरवर फेकले गेले. शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसले. तर दूसरे शिंग मांडीत घुसले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापुरला हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Like this:
Like Loading...