breaking-newsक्रिडा

कोलकाताचा हैदराबादवर 5 गडी राखून विजय

हैदराबाद – सुनील नारायण, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव करत बाद फेरीतील आप्ले स्थान पक्के केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारीत 20 षटकांत 9 बाद 172 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना कोलकाताने 19.4 षटकांत 5 गडी बाद 173 धावा करत हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला.

KolkataKnightRiders

@KKRiders

1⃣6⃣ Points and into the Playoffs we go! 💜
A commendable performance from the , as we complete a hat-trick of wins and clear the first hurdle! 😎💪

आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या सुनील नारायण आणि ख्रिस लिनया जोडीने धमाकेदार सुरुवात करुन देत चौथ्याच षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर झळकावले. अर्धशतक झाल्यानंतर लागलीच नारायण मोठा फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्याने 10 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 29 धावा करत लिन सोबत 3.4 षटकात 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर लिनने उथप्पाच्या साथीत फटकेबाजी करत 10.5 षटकातच संघाचे शतक फलकावर लगावले. तर केवळ 39 चेंडूतच आपले अर्धशतक फटकावले.

KolkataKnightRiders

@KKRiders

SRH – 172/9, 20 Overs
KKR – 173/5, 19.4 Overs

We had a challenging total to chase but we did it comfortably with 5 wickets in hand! Playoffs, here we come!!! 💪

अर्धशतक फटकावल्यावर लागलीच लिन बाद झाला. त्याने 43 चेंडूत 55 धावांची महत्वपुर्ण खेळी करताना रॉबिन उथप्पा सोबत 9.2 षटकात 62 धावांची भागीदारी केली. तर रॉबिन उथप्पाने 34 चेंडूत 45 धावांची महत्वपुर्ण खेळी केली. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिकने नितिश राणाच्या साथीत संघाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला.

SunRisers Hyderabad

@SunRisers

Single to mid-on by Karthik finishes the thrilling match as the Knights get a win with 5 wickets and 2 balls remaining.-173/5(19.4)

तत्पूर्वी, शिखर धवन आणि श्रीवत्स गोस्वामी यांची झंझावाती सलामी, तसेच विल्यमसनच्या खेळीमुळे हैदराबादच्या संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवता आले. शिखर धवनने श्रीवत्स गोस्वामीच्या साथीत हैदराबादला 8.4 षटकांत 79 धावांची वेगवान पायाभरणी करून दिली.

IndianPremierLeague

@IPL

Match 54. It’s all over! Kolkata Knight Riders won by 5 wickets http://bit.ly/IPL2018-54 

गोस्वामीने 26 चेंडूंत 35 धावा केल्या. शिखर धवनने केन विल्यमसनच्या साथीत 4.1 षटकांत 48 धावांची भर घातली. केवळ 17 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 36 धावा फटकावणाऱ्या विल्यमसनला बाद करून सीअरलेसने ही जोडी फोडली. शिखर धवनने दुसऱ्या बाजूने किल्ला लढविताना 39 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारांसह 50 धावा फटकावीत मनीष पांडेच्या साथीत 14 धावांची भर घातली. अखेर प्रसिद्ध कृष्णाने धवनला पायचित करून त्याची खेळी संपुष्टात आणली. मनीष पांडे 22 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 25 धावा करून प्रसिद्ध कृष्णाने अखेरच्या षटकात 3 गडीबाद करीत हैदराबादचा डाव 172 धावांवर रोखला.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

IndianPremierLeague

@IPL

And it’s all over here at Hyderabad as the @KKRiders beat by 5 wickets.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button